आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने देखील भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ‘पीएम केअर्स फंड’ मध्ये 50,000 डॉलर्स (सुमारे 37 लाख रुपये) दान दिले.
त्यानंतर आत्ता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett lee) भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. ब्रेट लीने भारतातील रूग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी 1 बिटकॉइन (सुमारे 42 लाख रुपये) दान केले आहे.
मदत करण्यासाठी हे थोडेसे योगदान देण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मी www.cyptorelief.in वर एक बिटकॉइन दान करीत आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतातील विविध रुग्णालयात ऑक्सिजन पुरविला जाईल.’असे त्याने ट्विट करून म्हटले आहे.