बिग बॉस मधील ‘या’ माजी स्पर्धकाचं झालं निधन

16

बिग बॉसचे एक्स स्पर्धक स्वामी ओम यांच्याबद्दल एक वाईट बातमी आली आहे. निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. तीन महिन्यांपूर्वी ओम स्वामी यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. काही वेळापूवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. आता काही वेळूपूर्वीच त्यांनी NCR च्या लोनीमधील DLF अंकुर विहारमध्ये अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, स्वामी ओम बिग बॉस १० मध्ये सहभागी झाली होते. अतिशय वादग्रस्त स्पर्धक म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते. बिग बॉस मध्ये स्वामी आणि व्ही.जे. बानी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. त्यामुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. स्वामी ओम यांचे मित्र मुकेश जैन यांचा मुलगा अर्जुन जैन यांनी ही बातमी दिली आहे.

अर्जुनच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी स्वामी ओम यांनी अर्धांगवायूचा झटका आला होता. तसेच यापूर्वी त्यांनी कोरोनाची लागणा झाली होती. परंतु त्यातून ते सुखरुप बरे झाले पण त्यांना चालताना त्रास होऊ लागला. कोरोनामुक्त झाले तरी प्रचंड अशक्तपणा आल्यामुळे स्वामी ओम यांना दैनंदिन व्यवहारांसाठी मदत घ्यावी लागत होती. अशक्तपणा दूर व्हावा आणि तब्येत सावरावी यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद लाभत नव्हता.

बिग बॉस नंतर स्वामी ओमचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एक मुलगी त्याच्यासोबत बिकिनीमध्ये दिसली. त्याच वेळी स्वामी ओम तपस्या करताना दिसले. यावरही बरेच वादंग झाले होते. त्यानंतर स्वामी ओम यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. 2019 मध्ये स्वामी ओम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.