उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये भाजपाच्या एका माजी आमदारावर छेडछाडीचा आरोप करत जमावाने त्याला मारहाण केली. तसेच कान धरून माफी मागायला लावली.एका इंटर कॉलेजचे चेअरमन असलेले भाजपाचे माजी आमदार मायाशंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीने छेड काढल्याचा आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप केला.
माया शंकर पाठक हे एकेकाळी वाराणसीमधून भाजपाचे आमदार होते. आता ते एमपी इन्स्टिट्युट अँड कॉम्प्युटर कॉलेज या नावाने शिक्षणसंस्था चालवतात. दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपाचे माजी आमदार असलेल्या मायाशंकर पाठक यांनी पीडित विद्यार्थिनीला ऑफीसमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे.पीडितेने घरी जाऊन ही घटना कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी संस्थेत येऊन मायाशंकर पाठक यांची पिटाई केली. सुरुवातीला त्यांना ऑफिसमध्ये मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांना मैदानात आणून खुर्चीवर बसवून मारहाण केली. यादरम्यान, भाजपा आमदार वारंवार आपल्या चुकीसाठी कान धरून माफी मागताना दिसत होते.