क्रिकेट आणि राजकारणाचा गेल्या काही दशकांपासूनचा संबंध राहिला आहे. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे.टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी राजकीय इनिंगला सुरुवात केली आहे.त्यांनी आज (30 डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी टीम इंडियाकडून 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी कसोटींमध्ये 26 तर वनडेमध्ये 15 विकेट्स घेतल्या.राजकारणात सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, किर्ती आझाद, विनोद कांबळी यासारख्या क्रिकेटपटुंचा समावेश आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्याच्या निर्णयावर ‘रजनीकांत हे एक दिग्गज नेते आहेत. आम्ही सर्व त्यांचा आदर करतो. रजनीकांत हे नेहमी तामिळनाडू आणि देशाच्या हिताची गोष्ट करतात’, अशी प्रतिक्रिया सी टी रवी यांनी दिली.लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या पक्षप्रवेशावेळी तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष सी टी रवी उपस्थित होते.