या माजी क्रिकेटपटू खेळाडूचे धक्कादायक विधान:जर विराट कोहलीच्या जागी मी असतो तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी आलो नसतो:

16

विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यातनंतर मायदेशी परतला आहे. त्यामुळे या गोष्टीला घेवून सध्या चर्चा सुरू आहे की, विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून माघारी यायला हवे होते की नव्हते.यावर माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोशीने कर्णधार विराट कोहली बद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे

दिलीप दोशींनी एका मुलाखतीमध्ये बोलत असताना विराट कोहलीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मला माहित आहे की, ही नवीन काळाची एक कल्पना आहे ज्याला खुप लोक मानतात. मी ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजतो. परंतु जेव्हा तुम्ही राष्ट्रीय कर्तव्यावर असता आणि जर मी विराट कोहलीच्या जागी असतो तर मी कधीच माघारी आलो नसतो.