प्लास्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहिमेचे माजी खा. निलेश राणेंनी केलं कौतुक

47

मालवण पंचायत समितीच्या ‘ऐतिहासिक स्थळे स्वच्छता अभियान’ अंतर्गत प्लॅस्टिक मुक्त किल्ले सिंधुदुर्ग मोहीमेला शुक्रवारी भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी सातत्याने उपक्रमशील कार्यक्रम राबविणाऱ्या मालवण पं. स. चे कौतुक करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा वारसा चालवण्याचे कार्य ही पंचायत समिती आणि येथील पदाधिकारी करीत असल्याचे ते म्हणाले.

स्वराज्य म्हणजे केवळ मुघलांचे अतिक्रमण रोखणे हेच काम नव्हते. तर स्वराज्यात शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, स्वच्छता असली पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने चांगले काम असले पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन मालवण पंचायत समितीचे आरोग्य, स्वच्छता सह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम सुरू असल्याचे ते म्हणाले.

शुक्रवारी सकाळी किल्ले सिंधुदुर्ग येथे पंचायत समिती मार्फत प्लॅस्टिक मुक्त अभियान राबवण्यात आले. श्री. राणे यांनी यावेळी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.