उसळी मारणाऱ्या खेळपट्ट्या बघून उत्तेजित होऊ नका, आपली ताकदीने बॉलिंग करा, असं कपिल देव म्हणाले आहे.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या टेस्ट मॅचला गुरूवार (17 डिसेंबर) पासून सुरूवात होणार आहे. मॅचआधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय बॉलरना धोक्याचा इशारा दिला आहे.
भारतीय बॉलरना ऑस्ट्रेलियात बॉलिंग करण्याचा अनुभव नाही, अनेकवेळा उसळी मारणाऱ्या खेळपट्ट्या बघून बॉलर उत्तेजित होतात, पण आपण आपल्या ताकदीवर बॉलिंग केली पाहिजे, हे त्यांना समजलं पाहिजे.ऑस्ट्रेलिया स्वत:च्या घरात खेळत आहे. जर भारत गुलाबी बॉलने भारतात खेळत असता, तर भारताच्या विजायची शक्यता 80 टक्के असती.
आपल्याकडे शानदार फास्ट बॉलर आहेत, पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू तिथल्या परिस्थितीला आपल्या बॉलरपेक्षा चांगल्या पद्धतीने समजतात,’ अशी प्रतिक्रिया कपिल देव यांनी कोलकात्यामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात दिली.पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पगडा भारी असल्याचंही कपिल देव म्हणाले. ‘