माजी आमदार नितीन पाटलांचा शिवसेनेत प्रवेश; भाजपला जोरदार हादरा

274

शिवसेनेचे पुन्हा एकदा औरंगाबाद जिल्ह्यात सरशी केली आहे. औरंगाबाद जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी आमदार नितीन पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन पाटील यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे.

मुंबई येथे वर्षा शासकीय निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश झाला. यावेळी शिवसेना नेते, मंत्री सुभाष देसाई, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी नितीन पाटील यांच्या प्रवेशाचा शिवसेना नक्कीच उपयोग करुन घेईल. नितीन पाटील साधारण एक वर्षांपुर्वी काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले होते. आता त्यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. शिवसेनेशी ते कसे जुळवून घेतात ते पाहणं औतसुक्याचं ठरेल.