अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे पगार थकले, उपासमारीची वेळ

15

औरंगाबादेत अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांचे पगार थकले असल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबादेत कोरोना रूग्नसंख्या झपाट्याने वाढत आहे. लॉकडाऊन कायम चालू आहे. अशा हातघाईच्या परिस्थितीत अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना 4 महिन्याचे वेतन देण्यात आलेलं नाही.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून पगार देण्यात आला नसल्याने ते अडचणीत सापडले आहे. पगार दिला नसल्याने अनेक कर्मचारी संकटात सापडले आहेत.

कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत हे कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता २४ तास सेवा देत आहेत. मात्र वेतनच मिळत नसल्याने ते हतबल झाले आहेत. लवकरात लवकर वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.