देशातील चार राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’ चा धोका, तर महाराष्ट्रात ‘हि’ परिस्थिती

55

कोरोना पाठोपाठ आता देशामध्ये ‘बर्ड फ्लू’ रोगाने पाऊल ठेवले आहे. देशातील ४ राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर आणि तामिळनाडूमध्ये अलर्ट इशारा देण्यात आला आहे. देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हिमाचल, मध्यप्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लू पसरलेला आहे. कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

काही अधिकाऱ्यांनी हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुलं हे संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी 170 हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्र राज्यात कुक्कुटपालक तसेच अंडी आणि मांस खाणाऱ्या नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही. परंतु व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालनाच्या ठिकाणी काही बाब आढळून आल्यास त्वरीत पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

पुण्यातील पश्‍चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात येतात. 2020-21 मध्ये या संस्थेने राज्यातील एकूण एक हजार 715 विष्ठा नमुने, एक हजार 913 रक्तजल नमुने आणि 1549 घशातील द्रव नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केली आहे.

बर्ड फ्लूचा हा धोका आणि मानवामध्येही याच्या संसर्गाचा धोका असल्यामुळं आता मध्य प्रदेश, केरळ, या राज्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र अद्यापही अशा संसर्गाचं निरिक्षण नसल्यामुळं तुर्तास बर्ड फ्लूचा धोका नसल्याचं स्पष्ट होत आहे.