मोदींनी घाबरून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं : प्रकाश आंबेडकर 

12

सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम केलं असं म्हणत चाहत्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदींनी घाबरून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं असं म्हटलं आहे.

देशाला काय नेता मिळाला आहे? लोक आपल्याला विसरून जातील याची त्यांना चिंता आहे. लोकांवर विश्वास नाही की आपल्या मृत्यूनंतर कोणी त्यांना विसरतील, कोण लक्षात ठेवेल की नाही. म्हणूनच त्यांनी मृत्यूआधी स्टेडियमला आपलं नाव दिलं आहे.म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी स्टेडियमच्या नामकरणावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव स्टेडियमला दिल्यानं सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलायला नको होते अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली आहे. मोदी सरकारवर यावरून जोरदार टीकाही केली गेली आहे.

सामना सुरु होण्याआधी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्धाटन करण्यात आलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री किरण रिजिजू, गुजरातचे राज्यपाल देवव्रत, बीसीसीआय सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते.