अाता १९ एप्रीलपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस!

20

संपूर्ण जगात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. रोज रुग्णसंख्या नवे ऊच्चांक गाठत आहे. अशावेळी अमेरिकी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वी १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणारी कोरोनाची लस आता १९ एप्रीपासूनच अमेरिकी नागरिकांसाठी ऊपलब्ध असणार आहे.

संपूर्ण जगात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जातो आहे. भारतातसुद्धा मोठ्याप्रमाणात लदीकरण केले जाते आहे. १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय अमेरिकेत घेण्यात आला होता. मात्र वाढती रुग्णसंख्या बघता आता १९ एप्रीलपासूनच लसीकरणाच्या या टप्प्यास सुरुवात होणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगीतले आहे.

१५० दशलक्ष डोस देण्याचा आकडा अमेरिकेने गाठला आहे. ६२ दशलक्ष लोकांचे यशस्वीपणे लसीकरण करणारा अमेरिका पहिला देश ठरला आहे. असे त्यांनी यावेळी सांगीतले. येत्या १०० दिवसांत अमेरिका २०० दशलक्ष डोसचा आकडा पार करणार आहे. असेसुद्धा त्यांनी यावेळी सांगीतले.

भारतातसुद्धा १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येण्याची मागणी ईंडीयन मेडीकल असोशिएशनने केली आहे. सध्या भारतात लसीकरण तीसर्‍या टप्प्यामध्ये आहे. ज्यामध्ये ४५ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना लस खुली करण्यात आली आहे.