नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना काँग्रेस कार्यकर्ते मदत करणार – नाना पटोले

16


मुंबई : संपूर्ण राज्यभरात कोरोना लसीकरण कार्यक्रम युद्ध पातळीवर सुरु कारण्यात येणार आहे. तसेच काही दिवसांत लस उपलब्ध झाल्यावर १८ ते ४४ वयोगातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण अधिक वेगवान गतीने राबवण्यात येणार आहे. तत्पूर्वी सर्व जिल्हयात काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात सुरु असलेल्या कोविड सहाय्यता मदत केंद्रामार्फेत नागरिकांना मदत केली जात आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे.


तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत गावोगावच्या नागरिकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन पटोले यांनी केले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. रूग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढते आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, रेमडेसिवीर इंजेक्शन औषधे याचा तुटवडा संपूर्ण देशभरात आहे. राज्यही त्याला अपवाद नाही. केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिका-यांच्या संपर्कात राहून लोकांना मदत मिळवून द्यावी असं वक्तव्य त्यांनी केलेआहे.


आज राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभरात रक्तदान शिबेरे आयोजित केली होती त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आवश्यकतेनुसार शिबिरांची संख्या वाढवली पाहिजे. गावोगावी जाऊन लसीकरणासाठी लोकांची नोंदणी करून लसीकरण केंद्रावर त्यांना लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत करावी असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यांनी केले.