अकोल्यात २४ मेपासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने व प्रवासीही मिळत नसल्याने एसटी महामंडळाने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू ठेवली होती.
अकोला शहरातील क्रमांक २ बसस्थानकातून अकोट, अमरावती, खामगाव, शेगाव, बुलडाणा, यवतमाळ या मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
गेल्या १६ मेपासून या निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता एसटी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहे.