निवडणूक पार पडताच इंधन दरवाढ दुप्पट

6

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लाक्षणिक वाढ झालेली पाहायला मिळाली.

केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकला तर, डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपयांपर्यंत येतील.केंद्र किंवा राज्य सरकारांना इंधनावरून मोठ्याप्रमाणात महसुल प्राप्ती होत असल्याने विकासाच्या अनुषंगाने हे शक्य नाही.

राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी दिल्लीकरांना ९३.२१ रूपये मोजावे लागत आहेत. ​राज्यात ​डिझेलचे दर ८४.०७ रूपये प्रती लिटर पर्यंत पोहचले आहेत. शनिवारी दिल्लीत पेट्रोल ९३.०४ रूपये लिटर, तर डिझेलचे दर ८३.८० रूपये लिटर होते.