मृद आणि जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी अनुसूचित जातीच्या शेकऱ्यांना ८० लाखांचा निधी

10

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद आणि जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे. जिल्हा परिषद योजनेतून चालू आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची समिती घेऊन त्यांची वयक्तिक क्षेत्रावरील खालीलप्रमाणे उपचार घेण्यात येतात. त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी ही योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. असे आव्हान जिल्हा कृषी अधिकारी पुणे यांनी केले आहे.

या निधीतून सलग समतल चर, शेतबांध बंदिस्ती, मजगी इत्यादी क्षेत्र उपचार तसेच डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे, सिमेंट व माती नाला बांधणे, शेततळे इत्यादी योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला, ७/१२ उतारा, ८ अ चा उतारा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.