काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीतील हिंसाचारावर केंद्र सरकारला आणि प्रामुख्याने गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ अमित शहा यांना बडतर्फ करावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. लाल किल्ल्यामध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमध्ये नाव येत असलेल्या दीप सिद्धूची ‘मोदी-शहा यांचा चेला’ अशी संभावना करताना हा संपूर्ण प्रकार शेतकरी आंदोलन कारस्थानाने दडपण्याचा प्रकार असल्याचाही आरोप केला आहे.
प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे.