पोलिसांच्या घरांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक बोलविण्यात आली होती.यात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंहामंडळाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले
या बैठकीत बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात पोलिसांसाठी जितकी घरे दिली, त्या तुलनेत स्वातंत्र्यानंतरही तितकी घरे उपलब्ध करून देता आली नाहीत. त्यामुळे पोलीस मनुष्यबळाच्या तुलनेत निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला लागा, घरे बांधा, असे आदेश दिले. नव्याने बांधण्यात येणाऱ्या घरांत चांगल्या सुविधा देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.