टाईम मासिकाकडून यावर्षीपासून ‘किड ऑफ द इयर’ पुरस्कार द्यायला सुरुवात केली आहे. या पुरस्कारासाठी जवळपास ५,००० जण स्पर्धेत होते. मात्र, या सगळ्यांवर मात करत गीतांजलीने या पुरस्कारावर नाव कोरले. तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली होती.
गीतांजली राव हिने आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत.
टाईम मासिकाने म्हटले आहे की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.