समाजात स्थान मिळवून देण्यासाठी तसेच तृतीयपंथीयांचे आर्थिक स्रोत वाढावे, नोकरभरतीत त्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी पोलीस विभागासह इतर विभागांत दोन टक्के आरक्षण देऊन शासकीय नोकरीत सहभागी करावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्रतिभा धानोरकर यांनी यंदाची दिवाळी पती खासदार बाळू धानोरकर यांच्यासोबत त्यांच्या घरी तृतीयपंथीयांसोबत साजरी केली होती. तेव्हाच तृतीयपंथीयांसाठी निवास, नोकरी यांसदर्भात काम करणार, असे संकेत त्यांनी दिले होते. दिवाळी संपताच लगेच त्या कामाला लागल्या आणि आज त्यांनी एक टप्पा पूर्ण केला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांनी या मागणीचे निवेदन दिले. याचा पाठपुरावा करून त्या आरक्षण मिळवतीलच, अशा विश्वास तृतीयपंथीयांना आहे.
तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पोलीस विभागात व इतर विभागात दोन टक्के आरक्षण देऊन नोकरीत स्थान द्यावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.तृतीयपंथीयांच्या विषयात आमदार धानोरकर केल्या काही दिवसांपूर्वीच सक्रिय झाल्या होत्या. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी ठोस काहीतरी करण्याचा मानस त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवला होता आणि त्या दिशेने कामही सुरू केले आहे.