“सल्ले देण्यापेक्षा ५० डॉक्टर द्या” ऊद्धव ठाकरेंनी लगावला या ऊद्योजकांस टोला

8

राज्यात कोरोना रग्णसंख्येत प्रचंड वाढ होते आहे. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे लॉकडाऊन लावू असा ईशारा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंनी दिला होता. यावरुनच ऊद्धव ठाकरेंवर टीकासुद्धा झाली. महाराष्ट्रातील अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला. त्यापाठोपाठ उद्योगपती आनंदा महिंद्रा यांनी ट्वीट करत लॉकडाऊन लावण्यापेक्षा निर्बंध कठोर करण्याचा सल्ला दिला. यावरुनच मुख्यमंत्र्यांनी आनंद महिंद्रा नाव न घेता टोला लगावला आहे.

लॉकडाऊनचा गरीब, लघू व मध्यम ऊद्योजकांवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ऊद्धवजी लॉकडाऊन लावू नका असे ट्वीट आनंद महिंद्रांनी केले होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये नाव न घेता महिद्रांना टोला लगावला आहे.

ऊद्धवजी समस्या अशी आहे की, लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गोरगरीब, कामगार, मजुरवर्गाला बसतो. लॉकडाऊन आरोग्यव्यवस्था भरभक्कम करण्यासाठी असतो असे आनंद महिंद्रा आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

यावरच ऊद्धव ठाकरे य‍ांनी आनंद महिंद्रांना टोला लगावला आहे. “काही लोक नसते सल्ले देत आहेत. मात्र माझे त्यांना सांगणे आहे. नुसते फर्नीचर ऊभारुन काय करणार, त्याठिकाणी काम करण्यासाठी डॉक्टरांचीसुद्धा आवश्यकता आहे. त्यामुळे ५० डॉक्टरसुद्धा द्या” असे म्हणत आनंद महिंद्रा यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे.