सोनिया गांधी, मायावतींना भारतरत्न द्या : माजी मुख्यमंत्री

58

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केली आहे. राजकारण, समाजकारण करणाऱ्या महिला शक्तीचा आदर करत सोनिया गांधी आणि मायावती यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असे रावत यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधी आणि मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल. मात्र, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. असं रावत म्हणाले.

https://twitter.com/harishrawatcmuk/status/1346386719545823232?s=20

आज त्यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं. त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा. अशी मागणी रावत यांनी ट्विट करून केली आहे.