शिवसेना-काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यास गंभीर चूका केल्या. त्यामुळेच मराठा समाजाने आरक्षण गमावले आहे, अशी टिका आमदार श्वेता महाले यांनी बुधवारी परभणीत आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेतून केली.
मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठी सवलती द्याव्यात, त्यासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशीही मागणी केली.
सावली या शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार महाले यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोदार टिका केली. भाजप सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकविले होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारने बेफिकीरपणा दाखविल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयात आरक्षण गमावल्या गेले, असे त्या म्हणाल्या.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत महाविकास आघाडीने फडणवीस सरकारने दिलेल्या सवलतीप्रमाणे सवलती द्याव्यात. 3 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. उमेदवारांची भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यांना सरकारी नोकरीत तातडीने नियुक्त करावे, अशीही मागणी केली.