आमच्या हातात गुजरात द्या, वाटल्यास अहमदाबादला तुमचं नाव देतो : राष्ट्रवादी आमदार

43

औरंगाबाद नामांतराचा वाद चांगलाच पेटलेला आहे. औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. या मागणीला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली होती. औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही. तसेच औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर, असं नामकरण करु असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिउत्तर दिलं आहे. “औरंगाबाद मनपाची सत्ता हातात द्या, सत्ता आल्यावर संभाजीनगर नाव देऊ असे वक्तव्य करणारे चंद्रकांत पाटील जी, आमच्या हातात गुजरात द्या आम्ही अहमदाबादचे नाव बदलून दाखवतो. वाटल्यास तुमचं नाव देतो. इतक्या वर्षांपासून सत्ता भोगुन अहमदाबादच नाव बदलता येत नाही का!,” असं ट्विट करून अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.