सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 18 वर्षावरील सर्व व्यक्तिंना लस देण्याची मागणी केली आहे. 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तिने लस मागितली तर त्याला लस द्या, वयाची अट शिथिल करून लस देण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कारोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ देण्याची परवानगी द्यावी, असं अशोक चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. किमान महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या कारणाने नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.