केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टने ना नफा ना तोटा तत्वावर इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहे. त्यावर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या नागरिकांना रेमडेसिवीरचा एक डोस मोफत द्या अशी घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन माहिती घेतली. यावेळी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती पाटील यांच्यासमोर मांडली.रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दिवसभर फिरावं लागत आहे.
रुग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागत आहे, त्यांचे अनुभव पाटील यांनी ऐकून घेऊन त्यांना धीर दिला. तसेच गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना किमान एक डोस मोफत देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली.
असोसिएशनकडून रुग्णांच्या नातेवाइकांचा त्रास कमी करण्यासाठी उपलब्ध साठ्यापैकी ना नफा ना तोटा तत्वावर रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले. यावर पाटील यांनी समाधान व्यक्त केले.