जागतिक कोरोना संकटामुळे देश हैराण झालेला असताना, आनंदाची बातमी म्हणजे लवकरच सगळ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. मात्र, ही लस टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत असल्याने ती लस आधी कुणाला द्यायची असे प्राधान्यक्रम केंद्र सरकार ठरवत आहे. केंद्र सरकरकडून लसीच्या वितरणासाठी नियोजन सुरु झालेलं असतानाच, हरियाणा सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.
पत्रात हरियाणा सरकारने लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात डॉक्टर, सुरक्षा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत आमदार आणि खासदारांनादेखील कोरोनाची लस द्या, अशी विनंती त्या पात्रता करण्यात आली आहे.
“आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत. ते सतत लोकांच्या संपर्कात असतात. ते अनेक लोकांना भेटतात. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनादेखील कोरोनाची लस देण्यात यावी”, अशी भूमिका हरियाणा सरकारने पत्रात मांडली आहे. हरियाणात सध्या 10 खासदार, 3 केंद्रीय मंत्री, 90 आमदार आणि 5 राज्यसभेचे खासदार आहेत.