भारतातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय ठरतो आहे. संपूर्ण जगात भारत हॉटस्पॉट झाला आहे. दुसर्या लाटेतील संसर्गाचा फैलाव पूर्वीपेक्षासुद्धा वेगाने होतोे आहे. भारतातील वाढती रुग्णसंख्या बघता कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर गेली असलेल्या न्युझीलंडने भारतीयांना प्रवेशबंदी केली आहे.
भरातातून येणार्या सर्व प्रवाशांना न्युझीलंडमध्ये येण्यास मनाई असणार आहे. भारतात असणार्या न्यझीलंडच्या नागरिकांसाठीसुद्धा हा नियम असणार आहे. ११ एप्रीलपासून ही प्रवेशबंदी लागू होणार असून २८ एप्रीलपर्यंत ही बंदी असणार आहे. न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसींडा आर्डेन यांनी ही घोषना केली आहे.
या कालवाधीमध्ये न्यझीलंड सरकार रीस्क मॅनेजमेंट अधिक मजबुत करण्यावर भर देणार आहे. न्यझीलंडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर पोहचली आहे. प्रभावी धोरणांमुळे हे शक्य झाले आहे. परिणामी न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांचे याकरिता जगभरातून कौतुक करण्यात येत आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावरसुद्धा भर देण्यात येत आहे.