लस देता का लस ? : कोव्हॉक्सीन लसीचा पुरेसा पुरवठा करा; अन्यथा आंदोलन करू

8

परभणी जिल्ह्यातील सेलू येथे कोव्हॉक्सीन लसीचा पुरेसा पुरवठा दुस-या डोससाठी तात्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

अ‍ॅड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेक, अ‍ॅड.देवराव दळवे, अ‍ॅड.योगेश सुर्यवंशी, सतिश काकडे, आदीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

जिल्ह्यात कोव्हॉक्सीन लसीचा मार्च मध्ये पहिला डोस देण्यात आला. त्यानंतर पहिला डोस घेणा-या नागरिकांची मुदत संपली असून दुस-या डोसच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत. यातच जिल्हा परिषदेकडे पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी नाही. अन्य वैद्यकीय अधिका-याकडे अतिरिक्त पदभार असल्याचे कळते. की देखील आजच्या परिस्थितीत अत्यंत गंभीर बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दुस-या डोससाठी जिल्ह्यात कोव्हॉक्सीन लसचा पुरवठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा, अन्यथा 17 मे रोजी कार्यालयासमोर उपोषणास नाईलाजाने बसावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.