ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरा, सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा:उद्धव ठाकरे

7

कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात लांबलेल्या निवडणुका आता पुन्हा घेण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांची बैठक संपली. राज्यात होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.उद्धव ठाकरे यांनी सर्व शिवसेना संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन केलं. 

राज्यातील 34 जिल्ह्यातील 14 हजार 234 ग्राम पंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे. यासाठी मुंबईत झालेल्या शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत रणनीती आखण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचयातीत शिवसेनेनं त्यांच्या संपर्क प्रमुखांना रणनिती आखुन सतर्क केलं आहे.15 जानेवारी 2021 रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत 8 जिल्ह्यात सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर झाले होते. पण, आता राज्य सरकारने आरक्षण सोडत निर्णयाबद्दल केल्यामुळे सरपंच निवडीचा निर्णयही रद्द झाला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरा, सर्व ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.