सोने-चांदीच्या भावाला पून्हा उधाण

8

गेल्या पाच दिवसात सोने आणि चांदीच्या भावात वाढ होऊ लागली आहे. लग्न सराईचा हंगाम सुरू झाल्याने सराफ व्यवसायिकांडून सोन्याची खरेदी वाढली असल्याचे सराफ व्यवसायिकांचे म्हणणे आहे. तर मागील तीन दिवसात चांदी ३ हजार ५०० रुपये तर सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम एक हजार रुपयांची वाढ झालेली आहे.

कमॉडीटी बाजारात सोने चांदीचे दर कायम आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लशीबाबत सकारात्मक घडामोडी घडत आहेत. यामुळे युरोपातील कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची शक्यता आहे. गुंतवणूक दारांमध्ये चैतण्याचे वातावरण आहे. त्यांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून हा ओघ भांडवली बाजारात वळवला आहे.

सोने चांदीच्या दारात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळू लागला होता. परंतु अनलॉक अंतर्गत सरकारने विवाह सोहळ्याला शंभर लोकांच्या उपस्थितीला मान्यता दिली आहे. त्यामुळे खरेदी वाढताच सोने चांदीच्या भावाला झळाळी मिळाली आहे.