टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. त्यांना कन्यारत्न झाले आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.
विराटने पोस्ट केली आहे, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असं त्याने लिहलं आहे.
सोशल मिडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना विराटने विनंती केली आहे. ही गोड बातमी देताना विराटने चाहत्यांकडे खास विनंती देखील केली आहे. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याची जास्त गरज असून आम्हाला थोड्या प्रायव्हसीची गरज आहे, अशी विनंती विराटने चाहत्यांकडे केली आहे.