गुड न्युज : लवकरच भारतात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तिसरी लस उपलब्ध होणार

11

सध्या भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या कंपनीने तयार केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोवॅक्सिन या लसद्वारे लसीकरण सुरू आहे. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसचे दोन डोस घ्यावे लागतातभारतात लवकरच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तिसरी लस उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता भारतात कोवोवॅक्स या लसची निर्मिती होणार आहे. अॅस्ट्राझेन्का, ऑस्कफर्ड विद्यापीठातील एक प्रयोगशाळा आणि पुण्याची सीरम इन्स्टिट्युट या तीन कंपन्यांनी संयुक्तपणे कोविशिल्ड (COVISHIELD) विकसित केली. या लसची निर्मिती पुण्यात सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया या कंपनीच्या कारखान्यात सुरू आहे. 

केंद्र सरकारने वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांसोबतच आता फ्रंट लाइन (लेव्हल) वॉरिअर अर्थात सैन्याच्या तिन्ही दलांचे अधिकारी आणि सैनिक, निमलष्करी दलांचे अधिकारी आणि जवान, पोलीस, अग्नीशमन दल, सफाई कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी या सर्वांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

भारतात २३ मार्च २०२० रोजी कोरोनामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाले. नंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले. ही प्रक्रिया सावधपणे राबवल्याचे फायदे देशाला मिळत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत लसचे दोन ऐवजी तीन पर्याय उपलब्ध झाले तर कोरोना विरुद्धच्या लढाईत भारताची बाजू प्रबळ होईल.

कोवॅक्सिन (COVAXIN) ही लस भारत बायोटेक, आयसीएमआर (Indian Council of Medical Research – ICMR) आणि एनआयव्ही (National Institute of Virology – NIV) यांनी विकसित केली आहे. या लसची निर्मिती भारत बायोटेक कंपनीच्या हैदराबाद येथील कारखान्यात सुरू आहे.