2020 हे संपूर्ण कोरोना काळातील वर्ष गेल्यानंतर त्याचा मोठा फटका बॉलीवूडला देखील बसला आहे. लॉकडाउनच्या काळात सिनेमागृह देखील बंद होती. पण या वर्षी अनेक सिनेमे रिलीज होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की, अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
लॉकडाऊननंतर बड्या बॉलिवूड स्टारचा थिएटरमध्ये रिलीज होणारा हा पहिला सिनेमा बनू शकतो, जो मोठ्या संख्येनं लोकांना आकर्षित करू शकतो. असं सांगितलं जात आहे की, हा सिनेमा 2 एप्रिल रोजी रिलीज केला जाऊ शकतो. या दिवशी पब्लिक हॉलिडे गुड फ्रायडे आहे.
चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आता बातमी अशी आहे की, हा चित्रपट 2 एप्रिल 2021 रोजी प्रदर्शित होईल आणि थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार रोहित शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखाली बनविलेला सूर्यवंशी गुड फ्राइडेला रिलीज होणार आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, पुढील आठवड्यात चित्रपटाच्या रिलीजची तारीख घोषित केली जाईल.
सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केले आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे.