गुड न्युज :’या’ तारखेला राज्यातील महाविद्यालय होणार पुन्हा सुरु

7

राज्यातील महाविद्यालय पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहेत, अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, ५० टक्के उपस्थितीची महावियालये सुरू होतील. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरीची अट स्थगित केली आहे. विद्यार्थ्यांच्या सोईनुसार परिक्षा घेतली जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना फीची सक्ती करू नये, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मंत्री सामंत मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.