गुड न्युज:भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती

13

कोरोना लशीबाबत भारतीय औषध महानियंत्रक संस्थेने (DCGI) भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.

सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची. आणि त्याला डीसीजीआयने मान्यता दिली आहे.

कोरोना विरोधातील उत्साही लढा मजबूत करण्यासाठी हा निर्णायक टप्पा असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. हो निर्णय निरोगी आणि कोविड-मुक्त देश होण्याच्या वाटचालीकडे वेगाने जात असल्याचं द्योतक आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कोरोना काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि सर्व कोरोना योद्ध्यांच्या कृतज्ञतेसाठी मी व्यक्त करतो. या योद्ध्यांनी अनेकांचे जीव वाचविल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत, असं मोदींनी म्हटलंय.