बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. काहिदिवसांपूर्वी कंगनाने चाहत्यांना तिला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. आता पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. कंगना रनौत कोरोना मुक्त झाली आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती स्वतः कंगनाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहून चाहत्यांना दिली आहे. कंगनाला कोरोनाची लागण झाल्यापासून, तिचे चाहते तिच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करत होते.
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे लिहिलं आहे की, ‘सर्वांना नमस्कार, माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी या विषाणूचा कसा पराभव केला हे मला तुम्हाला या बद्दल काही सांगायचे आहे, की मी या विषाणूला कसे हरवले.
मला या विषाणूबद्दल बोलू नये, असे सांगितले गेले आहे. होय, हे खरं आहे की कोरोनाबद्दल काही सांगितले तर, बरेच लोक रागावतात. सर्व चाहते आणि हितचिंतकांचे आभार आणि खूप प्रेम.’ असे तिने म्हटले आहे.