एमपीएससी’ च्या विध्यार्थ्यांसाठी गुड न्युज

26

मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.

पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न आणि कोरोनामुळे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती ही दोन प्रमुख कारणे त्यामागे असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

सामान्य प्रशानाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेऊन वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी वाढवून द्यावी, असे निर्देश आयोगाला दिले जाणार आहेत.