अमेरिकेचे माझी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपली मुलगी मालिया ओबामाच्या बॉयफ्रेंडविषयी सांगितले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा यांच्या स्वभावामूळे जगभरात ते कायम चर्चेत असतात. राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि कौटुंबिक व्यक्ती म्हणूनही ते हमखास चर्चेत राहिले आहेत.
नुकतेच त्यांनी आपली मुलगी मालिया ओबामाच्या बॉयफ्रेंडविषयी मुलाखतीत सांगितले. ओबामा म्हणाले, “माझी मुलीचा बॉयफ्रेंड एक ब्रिटिश आहे. आणि तो कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या काळापासून आमच्या कुटुंबासोबत राहतो आहे.” असं असलं तरी ओबामा यांनी मुलीच्या प्रियकराची ओळख मात्र सांगितली नाही.
ते ‘द बिल सिमन्स पॉडकास्ट’च्या मुलाखतीत बोलत होते.
क्वारंटीन काळात मुलगी साशा, मालिया आणि तिचा बॉयफ्रेंड यांच्यासोबत खूप चांगला वेळ घालवला, असंही ओबामा यांनी सांगितलं. बराक ओबामा यांनी चेष्टा मस्करीत मलियाच्या बॉयफ्रेंडचा आहार वेगळा असून या काळात कुटुंबाच्या किचनचा खर्च 30 टक्क्यांनी वाढल्याचंही सांगितलं. त्याचं जेवण पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो असंही ते म्हणाले.