Good News! ‘होणार सून मी या घरची’ फेम शशांक केतकरच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन

13

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘होणार सून मी या घरची’ मधील अभिनेता शशांक केतकर कायमच चर्चेत राहिला आहे. नाताळचं निमित्त साधून त्याने ही गुड न्यूज शेअर करत आपल्या चाहत्यांना काल सुखद धक्का दिला आहे. त्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

शशांक केतकर लवकरच बाबा होणार आहे. शशांक केतकरने पत्नी प्रियंका केतकरचा बेबी बंपसह फोटो शेअर करत गोड बातमी दिली आहे. शशांकचं प्रियंकासोबतचा हा दुसरा विवाह आहे. शशांक केतकर ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्री च्या व्यक्तीरेखेमुळे खूप प्रसिद्ध आहे. या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर ही पडद्यावरची ही जोडी रिअल लाइफमध्ये विवाहबंधनात अडकली. पण हा विवाह फार काळ टिकला नाही. वर्ष-दोन वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षांनी शशांकच्या आयुष्यात प्रियांका ढवळे आली आणि त्यांनी विवाह केला.

सांताक्लॉज येतो आणि आपल्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण, सांताक्लॉजने दिलेल्या भेटवस्तूंपैकी एखादी भेटवस्तू इतकी सुंदर असू शकते याची मात्र आम्हाला कल्पना नव्हती. तुम्हा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी हॉलिडे आणि नाताळच्या शुभेच्छा, अशी पोस्ट करत शशांकने गोड बातमी दिली आहे. येत्या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे. यात अभिनेत्री धनश्री काडगांवकर, करीना कपूर खान, अनुष्का शर्मा यांच्याही घरी नव्या सदस्यांचं आगमन होणार आहे.