सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. त्यात भारतात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे. आज मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा माल इतर देशातून पुरवला जात आहे.
तर दुसरीकडे भारताला मदत करणाऱ्यासाठी अनेकांनी हात पुढे केला आहे. टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांनीही सरकारला विविध रूपांत मदत सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी गुगलने कोरोना संसर्गाशी दोन-हात करण्यासाठी मदत निधी म्हणून 135 कोटी रुपये मदत भारताला देऊ केली आहे. आता त्यापाठोपाठ ॲपल या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही आज भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत देण्याचा विचार कॉमपणी कारणात असल्याचे बोलून दाखविले आहे.
या ससंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे भारतात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत जे कोरोना महामारीविरुद्ध लढत आहेत,ते कोरोना योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण आणि आमच्या कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही वैचारिकदृष्ट्या ठामपणे उभे आहोत. भारतातील मदत कार्यासाठी लवकरच ॲपल आर्थिक मदत देईल” असे जाहीर केले आहे.Google नंतर आता भारत ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी Apple करणार मदत !