गुंड बाळा दराडेला बारामती तालुका पोलिसांनी नाशिकमधून ठोकल्या बेड्या

61

बारामती :दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा गुंड बाळा दराडे याला अखेर बारामती तालुका पोलिसांनी नाशिकमधून बेड्या ठोकल्या. दराडेची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी ५० हजारांचे बक्षीस ठेवले होते.

त्‍याच्‍याविरोधात भिगवण पोलिसात सर्वाधिक गुन्ह्यांची दाखल आहेत. तसेच त्‍याच्‍यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्‍यात आली होती. विशेषतः त्याने गुन्हेगारी क्षेत्रात युवकांना ओढून आपले साम्राज्य उभे केले होते.गेल्या काही वर्षात त्याने बारामती एमआयडीसी तसेच भिगवण व इंदापुर तालुक्यात मोठी दहशत माजवली होती. 

 तो नाशिकमध्ये असल्याची माहिती बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळताच ढवाण व त्यांचे गुन्हा शोध पथकाने नाशिक येथे जाऊन मोठ्या शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वेळोवेळी पोलिसांना तो चकवा देण्यात यशस्वी होत होता. काही पोलिसच त्याला मदत करतअसल्याचे पुढे आले होते. बाळा दराडे याची माहिती देणाऱ्यास ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी तब्बल ५० हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.