महाविकास आघाडी सरकारवर गोपीचंद पडळकरांचे आरोप

7

धनगर समाजातील मेंढपाळ बांधवांसाठी फडणवीस सरकारने 2018 मध्ये महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना सुरु केली होती.आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धनगर समाजासाठी सुरु केलेली योजना बंद केल्याचाही आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

फडणवीस सरकारने जी 1 हजार कोटी रुपयांची घोषणा केली, त्यावरही पुढे कार्यवाही झाली नाही. त्यावरुन हे सरकार धनगर समाजाच्या विरोधात असल्याचं दिसतंय. यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा आणि महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजना पुन्हा सुरु करावी,” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांना निधी उपलब्ध करुन द्यावा. 2019-20 चे 1 कोटी आणि 2020-21 चे 1 कोटी निधी द्यावा. जे आदिवासींना ते धनगरांना या प्रमाणे निर्णय घ्यावा. यावर्षी आदिवासींना 8 हजार 853 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यापटीत धनगरांनाही निधी द्यावा,” अशी मागणीही पडळकरांनी ठाकरे सरकारकडे केली.