गुजरातमध्ये ७१ दिवसात ६१ हजार कोरोना पॉझिटिव्ह केसेस लपवण्यात आल्याची बातमी समोर येतेय. गोव्यात ऑक्सिजन मिळत नसल्याने रोज लोकांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशमध्ये २ हजार लोकांचे मृतदेह नदीमध्ये फेकण्यात आल्याची बातमी आहे.
भाजपाशासित राज्यांमध्ये सरकार विफल झाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा उद्योग यांनी सुरु केला आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते, राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगली कामे दिसत नसतील तर मग त्याला काही इलाज नाही. मात्र महाराष्ट्रात चांगली कामे होत आहेत ही सत्य परिस्थिती आहे असेही नवाब मलिक म्हणाले.