महाराष्ट्रात तीनचाकी अॉटोरिक्षाचे सरकार – अमित शहा

14

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आज दि. ७ फेबृवारी रोजी महाराष्ट्र दौर्‍यावर होते. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऊद्घाटनासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. अमित शहा वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाकरिता येत असल्याची घोषणा नारायण राणे यांनी दोन दिवसांअगोदरच “अमित शहांच्या पायगुणाने राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार जावे” असे वक्तव्य करत त्यांनी केली होती. त्यानंतर अमित शहा राज्याच्या राजकारणावर काय बोलतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अमित शहा यांनी यावेळी बोलतांना राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची तुलना त्यांनी तीन चाकी ऑटोरिक्षाशी करत सरकारवर हल्ला चढवल. राज्यात तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार तयार झाले असून या ओटोरिक्षाचे प्रत्येक चाक वेगवेगळ्या दिशेला जात आहे, सरकारमधील तिनही पक्षांमध्ये समन्वय आणि एकवाक्यता यांचा अभाव असल्याचे शहा यावेळी म्हणाले.

“बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण हे तत्वाचे राजकारण होते. बाळासाहेब गेलेत, परंतू शिवसेने आता सत्तेसाठी तत्वांना मुठनाती देत आहे. जनादेशाचा अनादर केल्याचा अारोप करुन आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले, परंतू महराष्ट्राचे जनता जाणते जनादेशाचा अनादर आम्ही तर तुम्हीच केला असून अामच्याशी दगाबाजी केली अाहे” असे शहा यावेळी म्हणाले.

“शिवसेना दगाबाजीचे राजकारण करते. आम्ही या पातळीवर ऊतरुन राजकारण करीत नाही. आम्ही जर या खालच्या पातळीवरील राजकारण केले असते तर शिवसेना महाराष्ट्रात नावालासुद्धा शिल्लक राहिली नसती” अशी घणाघाती टीकासुद्धा अमित शहा यांनी यावेळी केली.

यावेळी नारायण राणेंवर अमित शहा यांनी स्तुतीसुमने बरसवली. “नारायण राणे अन्यायाचा प्रतिकार करणारे नेते आहेत. यामुळेच त्यांचा प्रवास हा वळणावळणीवा राहिला असल्याचे” ते यावेळी म्हणाले.

या ऊद्घाटन कार्यक्रमास विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजपातील अनेक मोठे नेते, पदाधिकारी ऊपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा नारायण राणेंच्या अाक्रमक भूमिकेचे कौतुक करत त्यांना “दबंग नेते” असे संबोधले.