इंडियन व्हेरियंट’ शब्दाबाबत सरकारचे सर्व मीडिया कंपन्यांना आदेश

7

पुन्हा एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना व्हायरसचा ‘इंडियन व्हेरियंट’ (Indian Veriant) हा चुकीचा शब्द वापरुन खोटी माहिती पसरवणाऱ्या सर्व सोशल मीडियावरील कंटेन्ट ताबतोब काढून टाकण्याचे आदेश सरकारने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना दिले आहे.

मंत्रालयाने १२ मे रोजी भारतातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन कोरोना विषाणूशी निगडीत Indian Veriant हा चुकीची माहिती देणारा शब्द,त्याचा संदर्भ, त्यासंदर्भातील कोणताही कंटेन्ट आढळल्यास तो तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच अनेकदा खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावरील कोरोनाविषयी अफवा पसरवणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याचे आदेश या आधीही सरकारने सोशल मीडिया कंपन्याना दिले होते.