मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभुमीवर घरावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध…

16

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी उच्च न्यायालयात केंद्र व राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नसल्यामुळे मराठा समाजातील तरुणाचा तीव्र भावना असल्याने सरकारचा निषेध म्हणून घरावर काळे झेंडे लावून दिनांक 13 मे रोजी निषेध केला आहे.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला २०१८ साली शिक्षण व नोकरीमध्ये १६ % आरक्षण देण्यासंबंधी महाराष्ट्राच्या विधिमंडळात सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या पाठींब्यासह बहुमताने संमत करण्यात आला,त्या कायद्याला आव्हान देणारी याचिका मा.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली त्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने शिक्षण व नोकरीमध्ये अनुक्रमे १२ व १३ % आरक्षणास मंजुरी दिली.

परंतू या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली व सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा रद्द केला. म्हणून सकल मराठा समाजामध्ये प्रचंड रोष, अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांनी समाजाची फसवणूक केल्याची भावना व्यक्त होत आहे.

म्हणून शहरातील सकल मराठा समाजातर्फे अँड माधव दाभाडे, कुलदीप जाधव,आदित्य खिस्ते, संकेत मगर,वैभव देशमुख आदींनी घरांवर काळे झेंडे लावुन सर्वच राजकीय पक्षांचा व केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.