नोकरदार मंडळींसाठी महत्वाची बातमी आहे. आता नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात अधिक वेळ काम करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. सध्याच्या दररोज कामाच्या आठ तासांवरून ते 12 तास करण्याचा सरकार विचार करत आहे. कामगार मंत्रालयानं संसदेत नुकताच याबाबतचा प्रस्ताव मांडला आहे. तो प्रस्ताव जर संसदेत मंजूर झाला तर कामगार वर्गाला १२ तास काम करावे लागेल.
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या अटीबाबतच्या कोड 2020 मसुद्याच्या नियमांनुसार दररोज कामाची वेळ 12 तासांची करण्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयानं दिला आहे. यामध्ये मधल्या जेवणाच्या वेळेच्या सुट्टीचाही समावेश आहे. 19 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या या ड्राफ्ट रुलनुसार, आठवड्यातील एकूण कामांचे तास मात्र पूर्वीप्रमाणेच 48 तासच ठेवण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार आठवड्यातील सहा दिवस दररोज कामाचे आठ तास असतात, तर एक दिवस सुट्टी असते. १२ तासांचा वेळ कामगारांना मानवेल का ? हा प्रश्नच आहे. पण अद्याप हा निर्णय झालेला नाही.