महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री होणार? काय घडले असे जाणुन घ्या

35

राज्यातील महाविकासआघाडी सरकार आणि राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात कायमच खटके ऊडत असतात. यामुळेच भगतसिंह कोश्यारी कायम चर्चेत असतात. ऊत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिला आहे. आता ऊत्तराखंडचे नविन मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतांना भाजपकडून भगतसिंह कोश्यारी यांचे नाव पुढे येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ऊत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजिनामा दिला आहे. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजिनाम्यामागे भगतसिंह कोश्यारी यांचाच हात असल्याच्या चर्चा ऊत्तराखंडमध्ये रंगत आहेत. भाजपकडून अद्याप मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचेही नाव समोर आलेले नाही, मात्र भगतसिंह कोश्यारी यांना नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे त्यांचे नाव समोर येणार असण्याची शक्यता आहे.

भगतसिंह कोश्यारी यांना नेतृत्वाचा अनुभव आहे. तसेच प्रशासकीय क्षेत्राचासुद्धा त्यांना अनुभव आहे. शिवाय कोश्यारी हे रा.स्व.संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय पातळीवरील संघाच्या अधिकार्‍यांशी त्यांचा संपर्क आहे. ऊत्तराखंडमधील भाजप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या ते अद्यापही थेट संपर्कात आहेत. ऊत्तराखंडमधील भाजपवर त्यांचे प्रभुत्वसुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होण्याचा अंदाज राजकीय वर्तुळात घेतला जातो आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार ऊत्तराखंडमधील भाजपमध्ये सध्या गटबाजीचे वातवरण आहे. त्यामुळे वरीष्ठ नेत्याचे नाव सुचवण्यात येईल, जेणेकरुन गटबाजीस वाव राहता कामा नये असे बोलले जात आहे. ऊत्तराखंडमध्ये जवळपास एक वर्षात निवडणुकींचे बिगुल वाजणार, आणि मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा कुठला चेहरा असणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.