उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे १२ जणांची नावं निश्चित केली आहेत. राज्यपालांना रीतसर सगळं कळवलेलं आहे. राज्यपाल त्यांची भूमिका जाहीर करतील. न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत,” असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे.
“केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावूक झाले. तोच भावूकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं म्हणत अजित पवारांनी मोदींना टोला लगावला आहे.
कोविड उपाययोजने करता नाशिकला ७० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा निधी नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येईल,” अशी माहितीही पवार यांनी दिली.
महाविकास आघाडीत कोणतेही वाद नाहीत. कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील’, असं सांगत अजित पवारांनी यांनी अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे .